विरोधकांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयावर धडक

16 Mar 2017 , 10:17:32 PM


अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी चा मुद्दा गाजत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, अशी भूमिका मांडली आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून विरोधकांनी थेट एसबीआयच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयावर धडक दिली. यावेळी अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा सभागृहात त्यांच्याविरोधात हक्कभंग आणू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
भट्टाचार्य यांना हे वक्तव्य करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. मोठ्या उद्योगपतींनी अनेक बँकांचे पैसे बुडवले. त्यांच्यामुळे देशातल्या ८ राष्ट्रीय बँका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्याबाबत कोणीही बोलत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा भांडवलदारांच्या डोळ्यात खूपत आहे. त्यामुळेच अशी बेताल वक्तव्य केली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

संबंधित लेख