उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का? – धनंजय मुंडे

16 Mar 2017 , 10:20:41 PM

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा या पीकांचे तसेच फळबागा व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकार काही पावले उचलणार का? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का? अशी जळजळीच टीका त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते मात्र काही केले नाही. कर्जमाफी आणि कर्जाचे पुनर्गठनही झालेले नाही. सरकार गंभीर नसून सकारात्मक चर्चा करायला तयार नाही. एलबीटीसाठी महापालिकांना १० हजार कोटींची मदत दिली जाते. यातून काही निवडक व्यापाऱ्यांचा फायदा झाला. मग कोट्यावधी शेतकऱ्यांना सरकार पैसे का देऊ शकत नाही? अशी विचारणा मुंडे यांनी केली. त्यामुळे या सभागृहात कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी विधान परिषदेत दिला.

संबंधित लेख