कर्जमाफी द्या, पोपटपंची करू नका ,शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांचा एल्गार

18 Mar 2017 , 08:02:46 PM


विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधी शुक्रवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आक्रमकपणे मांडली. दिल्लीचा पोपट काय म्हणतोय कर्जमाफी नाही म्हणतोय, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी संपूर्ण विधानभवन परिसर विरोधकांनी दणाणून सोडला. विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाजात आजही विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला. यामुळे विधानसभेचं कामकाज ४ वेळा तहकूब करण्यात आलं. विरोधकांच्या गदारोळामुळे अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं.

संबंधित लेख