अर्थसंकल्प शेतकरीविरोधी आणि निराशाजनक - सुनील तटकरे

19 Mar 2017 , 01:02:22 AM


यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरीविरोधी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. काही महत्त्वाची घोषणा होईल, अशी राज्याच्या जनतेला अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी पूर्णतः दिशाहीन असा अर्थसंकल्प मांडला. किमान आधारभूत किंमत वाढण्याऐवजी आज अस्तित्वात असलेल्या किंमतीत सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी होत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे आणि पूर्णपणे मोडकळीस आला आहे. पण शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात केलेल्या नसल्याची खंत तटकरे यांनी व्यक्त केली. तसेच 'मेक इन इंडिया', 'मेक इन महाराष्ट्र' या सरकारने घोषित केलेल्या योजनांच्या त्रुटीदेखील त्यांनी निदर्शनास आणल्या.

संबंधित लेख