अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस आणि कृतीचा दुष्काळ –आ. जयदत्त क्षीरसागर

20 Mar 2017 , 06:34:56 PM


आजचा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. शेती कर्जमुक्तीविषयी कोणतीही तरतूद सरकारने केलेली नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ठोस तरतूद नाही. मागील अर्थसंकल्पातील ५०% रक्कम खर्च न करू शकलेल्या सरकारची अकार्यक्षमता आणि निष्काळजीपणा यातून दिसत असल्याची टीका आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. शिवसेनेने कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर केलेले घुमजाव धक्कादायक असून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे असल्याची टीकाही त्यांनी केली.

संबंधित लेख