राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई येथे सोशल मिडियाचा प्रभावी वापर या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

20 Mar 2017 , 11:09:45 PM


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे रविवारी सोशल मिडियाचा प्रभावी वापर या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये पक्षाच्या खासदार  सुप्रिया सुळे  , राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांचे विचार जनसामान्य तसेच आजच्या तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करावे तसेच सामान्य जनता आणि शेतकरी विरोधी कृतीवर लक्ष ठेवून त्यावर अभ्यासात्मक मतं मांडावीत असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

संबंधित लेख