आमदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

23 Mar 2017 , 12:33:32 AM


विधिमंडळात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या निषेधार्थ अहमदनगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अभिजित खोसे, माणिकराव विधाते, महिला अध्यक्षा रेषमाताई आठरे, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, सुरेश बनसोडे, वैभव ढाकने, गजेंद्र भांडवलकर तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख