राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेतकऱ्यांसाठी लढले- सुनील तटकरे

23 Mar 2017 , 12:36:21 AM


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेतकऱ्यांसाठी लढले, कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीवर ते ठाम राहिले, यासाठी जर त्यांना निलंबीत केलं जात असेल तर पक्षाला या आमदारांचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी व्यक्त केली आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी सभागृहात जे आंदोलन केले ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी होते. राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहाचा कोणत्याही प्रकारे अवमान केला नाही. सत्ताधारी पक्षाला आपले बहुमत सिद्ध करण्यास अडचण येणार होती, म्हणून सत्तेचा वापर करत भाजपने आमदारांचे निलंबन केले असा आरोप त्यांनी केला.

संबंधित लेख