शेतकऱ्यांची कर्जमाफी, आमदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरेगांव तालुक्याच्या वतीने धडक मोर्चा

24 Mar 2017 , 10:54:03 PM


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरेगांव तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी, अधिवेशन काळात १९ आमदारांचे झालेले निलंबन तसेच शेतकऱ्यांच्या इतर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सरकार विरोधात आवाज उठवला. यावेळी शेतकरी मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्री. खराडे यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसामान्यांचे हित जोपासणारा व त्यांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. त्यामुळे आंदोलनाद्वारे व्यक्त झालेली सामान्य जनतेची भावना शासनाकडे पोहोचवावी, अशी विनंती प्रांत व तहसीलदार यांना करण्यात आली. 

संबंधित लेख