संघर्षयात्रेला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद - आ.जितेंद्र आव्हाड

29 Mar 2017 , 11:06:40 PM


विरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा ही शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, वाढत्या महागाईविरोधात, महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अशी सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारी संघर्षयात्रा आहे. पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांचा व शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद संघर्षयात्रेला मिळत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अबू आझमी उपस्थित होते.

संबंधित लेख