राज्यातील शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा - अजित पवार

30 Mar 2017 , 07:44:04 PM


विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या संघर्षयात्रेची पहिली सभा सिंदेवाही येथे पार पडली. या सभेस उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खाअशोक चव्हाण,आमदार जितेंद्र आव्हाड, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश गजभिये, पंतगराव कदम, विजय वड्डेटीवार, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अन्य विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा म्हणून विरोधकांनी संघर्षयात्रा काढली असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राज्यातील शेतकरी पेटून उठला तर या सरकारमधले लोक भूईसपाट होतील, असा इशाराही त्यांनी दिला. देशात आणि राज्यात आलेलं भाजप सरकार हे शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या १९ आमदारांना या भाजप सरकारने निलंबीत केले, ही एकप्रकारे लोकशाहीची हत्या असल्याची टीका पवार यांनी केली.

संबंधित लेख