सरकार येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही शेतमालाला भाव मिळालेला नसून ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची थट्टा आहे- जयंत पाटील

30 Mar 2017 , 08:36:55 PM


यवतमाळ मधील करंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. चाय पे चर्चा आणि त्यासारख्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपने अनेक प्रकारची आश्वासने जनतेला दिली होती, यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमात आमचे सरकार आल्यास शेतमालाला भाव देऊ, असे आश्वासन सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. सरकार येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही शेतमालाला भाव मिळालेला नसून ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची थट्टा आहे, अशी घणाघाती टीका पाटील यांनी यावेळी केली. कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या १९ आमदारांना निलंबीत केले गेले. आमचीही कर्जमाफीची मागणी आहे, सरकारने आम्हालाही निलंबीत करावे, असेही ते म्हणाले. कर्जमाफी न देण्याची या सरकारची नीती स्पष्ट असून या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने संघर्षयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

संबंधित लेख