शेतकऱ्यांची कर्जमाफी, आमदारांच्या निलंबनाविरोधात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलन

30 Mar 2017 , 08:41:30 PM


शेतकरी कर्जमाफी तात्काळ व्हावी, तसेच शेतकऱ्यांसाठी विधानसभेत आवाज उठवणाऱ्या १९ आमदारांचे निलंबन त्वरीत रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवदेन पत्र जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालीदंर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्ष वैशाली नागवडे, पुणे जि. राष्ट्रवादी युवती अध्यक्ष अश्विनी खाडे, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, युवक व महीला कार्यकर्ते उपस्थित होते. समाजातील संवेदनशील व जबाबदार नागरिकांनीदेखील स्वयंस्फुर्तीने या आंदोलनात सहभाग नोंदवला.

संबंधित लेख