शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा दुसऱ्या दिवशी सेवाग्राम येथे पोहोचली

30 Mar 2017 , 09:00:48 PM


शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा आज दुसऱ्या दिवशी सेवाग्राम येथे पोहोचली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देऊन त्यांचे स्मरण आमदारांनी केले. महात्मा गांधींच्या विचाराने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी दिशा दिली. अनेक पिढ्या येतील आणि जातील पण गांधीजींचे विचार या देशाला नेहमीच मार्गदर्शन करतील. त्यामुळे आश्रमाला भेट देऊन, त्यांच्या विचारांचे स्मरण करून पुढच्या संघर्षासाठी संघर्षयात्रा वाटचाल करणार असल्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यानंतर पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला व समाधी स्थळाला भेट देऊन विरोधक आमदारांनी विनोबाजींना अभिवादन केले.

संबंधित लेख