कर्जमाफी, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था या सर्वच स्तरांवर हे सरकार अपयशी ठरले आहे- आ. जयदत्त क्षिरसागर

30 Mar 2017 , 09:11:51 PM


संघर्षयात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज सेलू येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जयदत्त क्षिरसागर  यांनी सरकारवर कडाडून टीका केली. आज शेतकरी अडचणीत सापडला आहे, अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होईल, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं वाटलं होतं, पण असे काहीही झाले नाही. हे सरकार पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांप्रती दाखवत असल्याची टीका क्षीरसागर यांनी केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड,राजेश टोपे , बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील,उपस्थित होते. कर्जमाफी, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था या सर्वच स्तरांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. शिवसेना तर डिंकाला चिकटलेल्या मुंगीप्रमाणे वागत आहे. कर्जमाफीसाठी आधी आरडाओरड करायची व नंतर मूग गिळून बसायचे, अशी भूमिका शिवसेनेने अवलंबली आहे. पण आम्ही शांत बसणार नाही, आम्ही सर्वसामान्यांसाठीचा हा लढा सुरुच ठेवणार, असेही क्षीरसागर यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित लेख