जालना येथे पोहोचली विरोधकांची संघर्षयात्रा

01 Apr 2017 , 11:56:48 PM

विरोधकांची संघर्षयात्रा  पोहोचली शनिवारी जालना येथे पोहोचली. येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, आ. राजेश टोपे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. जितेंद्र आव्हाड व अन्य नेते उपस्थित होते.

राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही, राज्यातील कायदा-सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे, म्हणजेच गेल्या तीन वर्षात या सरकारने कोणतेही काम केलेले नाही. गेल्या तीन वर्षांपासून फक्त नौटंकी सुरु आहे. लोकांना मूर्ख बनवण्याचं काम हे सरकार आणि सरकारामधील मंडळी करत आहेत, अशी प्रखर टीका अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली. आज राज्यातील शेतकऱ्याला मारहाण करेपर्यंत या सरकारची मजल जात आहे. रक्तबंबाळ अवस्थेत औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारे आमच्यासमोर उभे असल्याचे आम्ही पाहिले. मंत्रालयात त्यांना अमानुष मारहाण झाली. पोलिसांकडे याबाबत विचारणा केली तर तेही आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. राज्यात याआधी असं कधी घडलं नव्हतं, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आदरणीय शरद पवार साहेब दुष्काळ दौऱ्यावर आले असता त्यांनी पाहणी केली आणि लोकांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचवले. आम्ही दोन वर्षांपासून कर्जमाफीची मागणी करत आहोत. पण हे पाषण हृद्यी सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही. या सरकारच्या प्रत्येक योजना म्हणजे पोकळ घोषणाबाजी असल्याची टीका यावेळी आ. राजेश टोपे यांनी केली.

संबंधित लेख