राज्यातील सरकारने शेतक-यांची घोर फसवणूक केली - धनंजय मुंडे

03 Apr 2017 , 06:55:27 PM

लोकसभा निवडणुकांच्या काळात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथेही जात असत तिथे अच्छे दिन आऐंगे असे अश्वासन देत असत. आता पंतप्रधानांच्या याच वक्तव्याची गावोगावी खिल्ली उडवली जाते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. संघर्षयात्रेदरम्यान लातूर जिल्ह्यातील उजनी येथे आज झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपने मोठमोठी आश्वासने शेतकऱ्यांना दिली मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. पंतप्रधानांनी आणि राज्यातील सरकारने शेतक-यांची घोर फसवणूक केली, असा आरोप मुंडे यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आ.विक्रम काळे, विद्या चव्हाण, धीरज देशमुख आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख