खा. शरद पवार यांनी कल्याण येथील शिबिरात कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

03 Apr 2017 , 07:10:41 PM

ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या कार्यकर्ता शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील बदललेल्या राजकारणाची जाणीव करून दिली. तसेच कार्यकर्त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिल राहण्याची आणि एकसंध राहून परिवर्तन घडविण्याचे आवहान केले.
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, ठाणे शहराध्यक्ष माजी खासदारआनंद परांजपे, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आणि ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकूर, आमदार ज्योती कलानी यांची या शिबिराला विशेष उपस्थिती होती.

संबंधित लेख