गारपीटीत जखमी झालेल्या ललिता वाळके यांना मदतीचा हात

03 Apr 2017 , 07:28:28 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी औसा तालुक्यातील एलौरी या गावी जाऊन गारपीटीत जखमी झालेल्या ललिता रविकांत वाळके यांची कुंभारी येथील अश्विनी रूग्णालयात भेट घेतली. वाळके यांच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे. त्यांचा हात ठीक व्हावा यासाठी डॉक्टर्सची टीम प्रयत्न करत आहे. पवार यांनी वाळकेंच्या उपचार खर्चासाठी काही रक्कम मदत म्हणून दिली. तसेच त्यांच्या पुढील उपचारासाठीदेखील काही मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित लेख