शेतकऱ्यांसाठी आम्ही आणखी तीव्र संघर्ष करू - सुनील तटकरे

04 Apr 2017 , 09:24:06 PM

सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवण्याचं काम या भाजप सरकारने केले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. शेतकऱ्यांचं कर्जमाफ व्हावं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा अशी मागणी आम्ही प्रत्येक अधिवेशनात करतो, मात्र सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून आम्ही ही संघर्षयात्रा काढली असून शेतकऱ्यांसाठी आम्ही आणखी तीव्र संघर्ष करू,असा इशारा तटकरे यांनी दिली. संघर्षयात्रेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विरोधी पक्षातील अन्य नेते उपस्थित होते.

पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, या सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे, म्हणून आम्ही ही संघर्षयात्रा काढली. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत याचा विश्वास शेतकऱ्यांना आहे, तसेच निवडणुका आणि संघर्षयात्रा याचा काडीमात्र संबंध नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो आहोत, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख