संघर्षयात्रेच्या इंदापूर येथील सभेस प्रचंड प्रतिसाद

04 Apr 2017 , 10:07:51 PM

प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत संघर्षयात्रेची इंदापूर येथील सभा पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सध्याच्या कठीण परिस्थितीत आता शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असून त्यासाठी हा संघर्ष आता सुरू झाला आहे. आता आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल, पण या सरकारची निष्क्रियता लोकांपुढे आलीच पाहिजे. एकतर कर्जमाफी मिळाली पाहिजे नाहीतर हे सरकार जळून खाक झालं पाहिजे, असा संघर्षाचा नारा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. विद्या चव्हाण आ. भाई जगताप आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख