इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न - अजित पवार

07 Apr 2017 , 10:22:40 PM

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवून निवडणुकीत यश मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. निवडणुका जवळ आल्या असता स्मारकाचे भूमिपूजन केले गेले मात्र प्रत्यक्षात पुझ कोणतेही काम केले गेले नसल्याचे आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंदू मिल येथे भेट दिली असता उघड झाले. विरोधकांनी डॉ. आज इंदू मिल येथे जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, मात्र अद्यापही स्मारकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. याबाबत विचारणा केली असता काम सुरू आहे, असे सरकारतर्फे सांगण्यात येते. त्यामुळे विरोधकांनी आज इंदू मिल येथे जाऊन प्रत्यक्षात कामाची पाहणी केली असता सरकारचे पितळ उघडे पडले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, प्रकाश गजभिये, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, भाई जगताप तसेच विरोधी पक्षांतील अन्य सदस्य उपस्थित होते. 

संबंधित लेख