शेतकरी कर्जमाफी न करणाऱ्या असंवेदनशील सरकारची विरोधकांनी काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा

08 Apr 2017 , 04:00:42 AM

भाजप सरकारचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी कर्जमाफी न देणाऱ्या सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या सुरुवातीपासून विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली होती. अधिवेनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी या मागणीसाठी आक्रमक पावित्रा घेतला मात्र सरकारतर्फे या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नसून विरोधकांनी याचा निषेध करत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. राजेश टोपे, आ. जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख