इगतपुरी येथे संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी बैठक

10 Apr 2017 , 11:27:54 PM

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सुरु असलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ तारखेपासून सुरू होत असून १७ व १८ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात यात्रा पोहोचणार आहे. नाशिकमधील संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी व पूर्व तयारीसाठीची एकत्र बैठक राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांच्या उपस्थितीत इगतपुरी येथे संपन्न झाली. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, आमदार निर्मला गावित, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रल्हाद जाधव, कचरू डुकरे, सोमनाथ खातळे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख