ठाणे येथे कार्यकर्त्यांसाठी वक्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

10 Apr 2017 , 11:38:11 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ठाणे येथील टिप टॉप हॉल येथे रविवारी वक्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्राध्यापक प्रदीप सोळुंखे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी राष्ट्रवादी ठाणे शहर( जिल्हा ) अध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक शहर ( जिल्हा ) अध्यक्ष मंदार केणी उपस्थित होते.

संबंधित लेख