खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आत्मचरित्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

11 Apr 2017 , 09:37:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्या 'उडान - ए ग्राफिक ग्लिम्प्स थ्रू द लाइफ ऑफ प्रफुल्ल पटेल' या आत्मचरित्राचे प्रकाशन सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमास पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, भाजपचे खा. राजीवप्रताप रूडी, क्रीडामंत्री विजय गोयल, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. आनंद शर्मा, जदयूचे महासचिव के. सी. त्यागी, माकपचे सीताराम येचुरी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख वक्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे खेळाविषयी असलेले प्रेम आणि या क्षेत्रात त्यांनी केलेल्या राजकीय योगदानाचे यावेळी कौतुक केले.

संबंधित लेख