शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमकपणे लढा देणार - संग्राम कोते पाटील

13 Apr 2017 , 11:03:27 PM

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने शेतकरी कर्जमाफीसाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद केले. प्रदेशाध्यक्ष संग्रामदादा कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
 
आंदोलनात प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष राहुल तायडे, कार्याध्यक्ष मयूर सोनवणे, जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण, जालना जिल्हाध्यक्ष गजू लोखंडे, विद्यापीठ अध्यक्ष अमोल दांडगे, दत्ता भांगे, राहुल पाटील, बबलू अंधारे, अक्षय शिंदे, जुबेर शेख, संदीप जाधव, डॉ. कपिल झोटिंग, सिद्धांत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख