राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी

14 Apr 2017 , 11:24:52 PM

संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज चैत्यभूमी, दादर येथील बाबासाहेबांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले.

दरम्यान, मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. माजी आमदार अशोक धात्रक, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकिम, कार्यालय अधीक्षक राजेश गांगण यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संबंधित लेख