राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेटबंद आंदोलन

14 Apr 2017 , 11:55:16 PM

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली असून आज उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गेटबंद आंदोलन केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी गेली चार वर्षे दुष्काळामुळे तसेच मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पीक वाया गेल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, पीकाला हमीभाव नाही, त्यातच कौटुंबिक व मुलांचे शैक्षणिक खर्च यामुळे शेतकऱ्यांना जगणे नकोसे झाले आहे. त्यामुळे सरकारने या परिस्थितीचा गंभीर विचार करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी आहे. या मागणीचे निवेदन विद्यार्थी कार्यकर्त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

संबंधित लेख