दिल्लीत महाराष्ट्राचा पत्ता '६, जनपथ'- हेमंत टकले

22 Dec 2015 , 09:19:10 AM

साधेपणाचे आणि सात्विकपणाचे दर्शनच आदरणीय शरद पवार यांनी आम्हाला दिलं अशा शब्दांत आमदार हेमंत टकले यांनी पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. पवार पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले, तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांना ३१ मार्च १९६९ रोजी पत्र लिहिले, या पत्रात तरुण राजकारण्यांची घुसमट व्यक्त केली होती. या पत्राचा शेवट त्यांनी 'जे जे माझ्या मनात आले, ती अस्वस्थता तुम्हाला कळवायची होती' असे लिहिले होते. एवढ्या मनमोकळेपणाने संवाद साधण्याची हतोटी पवार साहेबांकडे आहे, असे टकले म्हणाले.

पवार साहेबांनी आमदार म्हणून पहिले भाषण 'कृषी आणि सहकार' या विषयावर १९६७ साली भाषण केले. तेव्हापासून २०१४ पर्यंत कृषिमंत्री असेपर्यंत एकाच विषयावर अखंड काम त्यांचे सुरू आहे. आदरणीय शरद पवार गृहराज्यमंत्री असताना पवार यांनी पोलिसांच्या गणवेषातील हाफ पँट ही फुल पँट बनली. हा महत्त्वपूर्ण नर्णय पवार यांनीच घेतला असल्याची आठवण टकले यांनी करून दिली.  दिल्लीत महाराष्ट्र कुठे आहे असे विचारल्यास त्याचे उत्तर निःसंशयपणे ६ जनपथ असेच मिळेल, असे टकले म्हणाले. तसेच पवार यांचे खेळाडू, कलाकार, शेतकरी, मागासवर्गीय, श्रमिक आणि सर्वच घटकांना आपलेसे वाटतात, असे सांगतानाच यशाचा उन्माद होऊ द्यायचा नाही, एवढा पवार साहेबांचा एकट गुण जरी अवलंबला, तरी आयुष्य समाधानाने जगता येईल असे टकले म्हणाले.

संबंधित लेख