खा.शरद पवार यांचा जीवनपट आता वेबसाईटद्वारे उलगडणार

15 Apr 2017 , 12:18:58 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या संसदिय कार्याला पन्नास वर्षे नुकतीच पूर्ण झाली. या ५० वर्षांच्या काळात राजकारण, समाजकारणात महत्त्वाचे योगदान देत असतानाच अनेक महत्त्वाची पदेही पवार यांनी भूषविली. त्यांच्या या अविरत कार्याची दखल घेत भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला आहे. शरद पवार यांच्या या संसदिय जीवनपट उलगडणारी एक वेबसाईट खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून कार्यान्वित करण्यात आली आहे. पवार साहेबांच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाचे प्रसंग तसेच घटनांचे व्हीडीओ व फोटोंचे संकलन या वेबसाईटमध्ये पाहता येणार आहे. आगामी काळातही नवनवीन फोटो आणि व्हीडिओंच्या माध्यमातून ही वेबसाईट अधिक समृद्ध करण्याचा मानस आहे. 
तुम्ही सोबतच्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटला भेट देऊ शकता...


संबंधित लेख