संघर्षयात्रेचा दुसऱ्या टप्प्यास आजपासून सुरूवात

15 Apr 2017 , 11:00:08 PM

कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष थांबणार नाही..

शेतकरी कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा आज सुरू झाला. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथे जिजाऊंना नमन करून विरोधी पक्षांनी आपल्या पुढील लढ्याची नांदी भरली. सिंदखेडराजा येथील जाहीर सभेस सुरूवात करण्यापूर्वी लातूरच्या शितल वायाळ या आत्महत्या केलेल्या मुलीला सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. शशिकांत शिंदे, विद्या चव्हाण, राजेश टोपे, प्रकाश गजभिये यांसह विरोधी पक्षातील इतर सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख