शहापूर येथील संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी, 'याचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा', असा नारा देत शेतकऱ्यांसाठीचा हा लढा यापुढे अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफी झाली नाही तर सरकारला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा त्यांनी सभेत बोलताना दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जितेंद्र आव्हाड, सुमन पाटील, विद्या चव्हाण, राजेश ...
पुढे वाचाधुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत? असा संतप्त सवाल पवार यांनी सरकारला केला. रोज वृत्तपत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत बातम्या वाचायला मिळतात, पण तरीही मुख्यमंत्री आम्ही अभ्यास करतोय, समिती गठीत करतोय अशी उत्तरे देतात हे वेळकाढूपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. समिती कसली गठीत करता? शेतक-यांचे किती कर्ज आहे याची आकडेवारी माहीत आहे, ...
पुढे वाचासंघर्षयात्रेदरम्यान मंगळवेढा येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, भारत भालके आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, सलग सात अधिवेशने राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे. या अधिवेशनात कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी आम्ही केली. भाजप ...
पुढे वाचा