संघर्षयात्रा सोमवारी नाशिक जिल्ह्यात

17 Apr 2017 , 09:23:03 PM

विरोधी पक्षांची संयुक्त संघर्षयात्रा सोमवार दि. १७ एप्रिल रोजी नाशिकपर्यंतचा पल्ला गाठणार आहे. सोमवारी मालेगाव, नामपूर, सटाणा, देवळा, चांदवड, पिंपळगांव बसवत, आडगांव येथे संघर्षयात्रेचा दौरा असून येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. संघर्षयात्रेला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरीही मोठ्या संख्येने संघर्षयात्रेला पाठिंबा देतील याची खात्री विरोधकांना आहे.

संबंधित लेख