राजमाता जिजाऊ, सावित्रीमाईंच्या महाराष्ट्र कुठे चालला आहे? - जितेंद्र आव्हाड

17 Apr 2017 , 10:57:21 PM

नंदुरबार येथील जाहीर सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना संबोधित केले. देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे, भाजपकडून शब्दांचा खेळ खेळले जात आहेत, समतेचं रुपांतर समरस्ता केलं जात आहे, आदिवासीचं वनवासी होत आहे, हा आंबेडकरांच्या संविधानाशी केलेला द्रोह असल्याची टीका आव्हाड यांनी यावेळी केली. ज्या देशात राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिराजी जन्मल्या त्या देशात एका शेतकरी कुटुंबातील तरुणीने आत्महत्या करणे म्हणजे राज्यासाठी दुःखाची बाब आहे. सरकारमधील मंत्री निवडणुकांसाठी प्रचंड फिरतात पण आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेट देणे त्यांना जमत नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.

संबंधित लेख