संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी शहापूर येथे होणार सांगता

18 Apr 2017 , 12:43:58 AM

विरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभत असून शेतकरी कर्जमाफीची मागणीने राज्यभरात जोर धरला आहे. ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये तसेच शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान शेतकरी आपल्या व्यथा मांडत असून, त्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या संघर्षायात्रेत सहभागी होत आहेत. नाशिक जिल्ह्यात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मंगळवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता याबाबत नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात येणार आहे. मंगळवारी घोटी व शहापूर येथे जाहीर सभांनंतर संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता होईल, मात्र शेतकऱ्यांसाठीचा लढा अधिक आक्रमकपणे सुरूच राहील, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार आहे. 

संबंधित लेख