शिवडे गावातील समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची संघर्षयात्रेने घेतली भेट

18 Apr 2017 , 09:41:08 PM

सिन्नर तालुक्यातील शिवडे गावातून प्रस्तावित समृद्धी महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण सुरु आहे, तेथील सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. तरिही सरकार दडपशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करत आहे. आज शेवडे येथे संघर्षयात्रा आली असता विरोधी पक्षातील सदस्यांनी या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच शेतकरी कर्जमाफी हा संघर्षयात्रेचा उद्देश असला तरी शेतकऱ्याच्या कोणत्याही प्रश्नाबाबत त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहू, जबरदस्तीने चाललेल्या या जमिन अधिग्रहणाबाबत सरकारविरूद्ध लढा देऊ, असा विश्वास सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे आणि विरोधी पक्षातील अन्य नेते उपस्थित होते.

संबंधित लेख