सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर - सुनील तटकरे

18 Apr 2017 , 10:46:26 PM

संघर्षयात्रेच्या घोटी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर तोफ डागली. आदरणीय शरद पवार साहेब कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून अनेक निर्णय घेतले, तसेच शेतकरी अडचणीत सापडले असताना त्यांना कर्जमाफी दिली, पण सध्याच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आ.जितेंद्र आव्हाड, सुमन पाटील, विद्या चव्हाण, राजेश टोपे, हेमंत टकले, अबू अझमी, जोगेंद्र कवाडे आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

समृद्धी महामार्गाची आवश्यकता नसतानाही तो बांधण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण सुरू आहे. यातूनच सरकार किती असंवेदनशील आहे याचा प्रत्यय येतो, असे तटकरे म्हणाले.

संघर्षयात्रेदरम्यान जिथे जिथे गेलो तेथील लोकांनी आम्हाला आसूड भेट म्हणूल दिला, हा आसूड कधी आणि कसा वापरणार, हे योग्य वेळ आल्यावर सांगू, असा इशारा यावेळी बोलताना अजित पवार यांनी दिला. 

संबंधित लेख