खा. सुप्रिया सुळे यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान साधला विविध सामाजिक घटकांतील लोकांशी संवाद

19 Apr 2017 , 07:02:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या तीन दिवसीय संवाद दौऱ्यास आजपासून सुरूवात होत असून दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जळगाव मधील बुद्धिजीवी घटकांशी सुळे यांनी संवाद साधला. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग होता. यावेळी विविध समाज घटकांचे प्रश्न आणि समाजकारणाबाबत त्यांनी चर्चा केली. 

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ याही उपस्थित होत्या.

संबंधित लेख