राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी संग्राम कोते पाटील यांची नियुक्ती

24 Apr 2017 , 07:50:05 PM

संग्राम शिवाजीराव कोते पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संग्राम कोते पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना कोते पाटील यांनी तब्बल ८० लाख विद्यार्थ्यांना पक्षाशी जोडले होते. त्यामुळे पक्ष बळकट व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोते पाटील सदैव कार्यतत्पर राहतील, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित लेख