नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आत्महत्यासत्र सुरूच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कर्जमाफीची मागणी कायम

25 Apr 2017 , 06:08:56 PM

नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्याच्या खेडगाव येथील माणिक अशोकराव रणदिवे या ३५ वर्षीय  शेतकऱ्याने  कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त रणदिवे कुटुंबियांच्या घरी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे सांत्वन केले. १५ महिन्यात नाशिकमधील सुमारे ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफी देण्यासाठी अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची सरकार वाट पाहणार आहे? असा सवाल अॅड. रविंद्र पगार यांनी केलाय.  कर्जमाफी करण्यासाठीच्या आवश्यक बाबींचा अभ्यास करत असल्याचे सांगून कर्जमाफी देण्यास सरकार चालढकल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कर्जमाफीची मागणी कायम असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचा संघर्ष सुरूच ठेवू, असेही ते पुढे म्हणाले. 

संबंधित लेख