जनतेच्या जीवनाशी निगडीत मुलभूत प्रश्नांवर आक्रमकपणे काम करणार – संग्राम कोते पाटील

25 Apr 2017 , 07:13:45 PM

राज्यात युवकांशी संबंधित अनेक विषय आहेत. रोजगार वाढ आणि कौशल्य विकास करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र त्याऐवजी बेरोजगारी वाढतानाच दिसत आहे. या प्रश्नांसोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्कमाफी, पेट्रोलची दरवाढ अशा जनतेच्या जीवनाशी निगडीत मुलभूत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होत काम करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी सांगितले. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी युवक संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही विद्यार्थी संघटनेसोबत समन्वय ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही काम करणार असल्याचे तसेच येत्या एका महिन्यात राज्यभर दौरा करुन युवक संघटनेची संपूर्ण कार्यकारणी व जिल्हा समित्यांची पुनर्रचना करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी युवक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मोहिते, रविकांत वर्पे, सचिव अभिषेक बोके, मयुर गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंडकर, पुणे शहराध्यक्ष राकेश कामठे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष संजोग वाघेरे, मनोज पाचपुते, जितेंद्र इंगवले, ऋषी परदेशी, संग्राम सस्ते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख