सांगली येथे विरोधकांची पत्रकार परिषद

26 Apr 2017 , 11:12:54 PM

राज्यसरकार पावलोपावली शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्याचे सिद्ध होत आहे. तुरीचा भीषण प्रश्न निर्माण झाला असतानाही त्यावर सरकारमधील लोक काही बोलण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांकडून तारखेचा खेळ खेळला जात आहे. तारखेचा खेळ बंद करा आणि ५०५० रु प्रती. क्विंटल भावाने शेतकऱ्यांची तूर विकत घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. ते सांगली येथील संघर्षयात्रेच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील आणि विरोधी पक्षातील अन्य आमदार उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री म्हणतात ज्यांना खरी गरज आहे त्यांचा कर्जमाफी दिली जाईल. मुख्यमंत्र्यांनी खरी गरज काय असते याची व्याख्या स्पष्ट करावी. एक तर तुम्ही कर्जमुक्ती द्या नाहीतर बाजूला व्हा आणि राज्याला मुक्त करा. सरकार कोणाचेही असो शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, यात आम्हाला राजकारण आणायचे नाही, तर शेतकरी वाचवायचा आहे, असे उद्गार पवार यांनी काढले.

संबंधित लेख