आगीमध्ये घर गमावलेल्या ऊसतोडणी मजुरांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली भेट

26 Apr 2017 , 11:27:38 PM

संघर्षयात्रेच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी (एच) गावातील ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्या सोमवारी आगीत जळून खाक झाल्या. हे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ऊसतोडणी मजुरांची विचारपूस केली. या आगीत ३१ झोपड्यांची राख झाली तर सात शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या तसेच मालमत्ता हानीदेखील झाली. या दुर्दैवी कुटुंबांना मदत व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

संबंधित लेख