या निष्क्रीय सरकारविरोधात आवाज उठवायलाच हवा - अजित पवार

27 Apr 2017 , 01:05:24 AM

तासगाव येथील संघर्षयात्रेच्या सभेत आज स्व.आर.आर. पाटील यांना अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्थानिक जनतेशी संवाद साधला. राज्यातील वाढते वीजदर सर्वसामान्यांसाठी व शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची दरवाढ झाली नव्हती. दरवर्षी दर वाढवले जात आहेत. सरकारला अडचणी असूल शकतात पण त्या अडचणींवर मात करून शेतकरी कसा सुखी राहील यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे. पण हे सरकार काही करण्यास तयार नाही. या निष्क्रीय सरकारविरोधात आवाज उठवायलाच हवा, असे प्रतिपादन पवार यांनी केले. आपण शांत राहिलो तर याने शेतकऱ्यांचेच नुकसान होईल आणि शेतकरी आणखी अडचणीत सापडेल, असेही ते पुढे म्हणाले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, दिलीप सोपल, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, सुनील केदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख