संघर्षयात्रेचा गुरूवारी सातारा जिल्ह्यात दौरा

27 Apr 2017 , 06:36:05 PM

शेतकरी कर्जमाफीसाठीची विरोधी पक्षांची संघर्षयात्रा गुरूवार, दि. २७ एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात पोहोचणार आहे. कराड येथे सकाळच्या सत्रात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी स्थानिक पत्रकारांशी संघर्षयात्रेच्या उद्दिष्ट्यांविषयी व आगामी रुपरेषेविषयी संवाद साधण्यात येईल. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन संघर्षयात्रेच्या सातारा जिल्ह्याच्या दिवसभराच्या पुढील दौऱ्यास सुरूवात होईल. यामध्ये वडगांव हवेली, माण तालुक्यातील दहिवडी तसेच गांधी मैदान येथे जाहीर सभांचा समावेश असणार आहे. वडगांव हवेली आणि मसुर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेटदेखील यादरम्यान विरोधी पक्षातील सदस्य़ घेणार आहेत. 

संबंधित लेख