प्रीतिसंगमावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वाहिली आदरांजली

27 Apr 2017 , 07:22:28 PM

शेतकरी कर्जमाफीसाठी निघालेली संघर्षयात्रा आज सातारा जिल्ह्यात पोहोचली आहे. सकाळच्या सत्रात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी दौऱ्याची सुरूवात करताना शेतकऱ्यांची तूर विकत घ्या, कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी संघर्षयात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात केली. त्यानंतर कराड येथे प्रीतिसंगमावर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी विरोधी पक्षातील सदस्यांनी अभिवादन करून आदरांजली वाहिली.

संबंधित लेख