महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम ...

02 May 2017 , 07:41:38 PM

आज १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना हुतात्मा चौक येथे पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस मुनाफ हकीम आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख