महाराष्ट्रदिनी राष्ट्रवादीचे तूर खरेदीच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन...

02 May 2017 , 08:11:27 PM

शेतक-यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सरकारला तूर भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. तूर उत्पादकांची तूर त्वरीत खरेदी करावी, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव मिळावा या मागण्यांच्या निवदनासह तूरीची पाकीटे या आंदोलनाच्या माध्यमातून तहसीलदारांना देण्यात आली. पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम आणि तहसिलदार हनुमंत पाटील यांना निषेध म्हणून प्रत्येकी दहा किलो तूर डाळ भेट दिली. तर, विधिमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर तहसील कार्यालयात, पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तहसील कार्यालय, आमदार प्रकाश गजभिये यांनी मौदा तहसील आणि आमदार ख्वाजा बेग यांनी आर्णी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.

शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी वरील मागण्यांसोबतच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा मुंबई-नागपूर समृ्द्धी महामार्ग रद्द करावा, अशी देखील मागणी केली आहे. तर आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी आर्णी तहसिलदार कार्यालयासमोर तूर खरेदीबाबतच्या शेतकरी विरोधी जीआरची होळी करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. 

संबंधित लेख