राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार महिन्याभरात जाहीर करणार - संग्राम कोते पाटील

03 May 2017 , 10:17:27 PM

विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौरा पूर्ण झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींना त्याचा अहवाल  देण्यात येईल. त्यानंतर दोन आठवड्यातच युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारणी व सर्व जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जातील, अशी माहिती संग्राम कोते पाटील यांनी नाशिक येथे दिली.

कोते पाटील सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल अहमदनगर येथे युवक मेळाव्याच्या प्रचंड प्रतिसादानंतर आज नाशिकमध्ये शहर आणि ग्रामीण अशा दोन बैठका संपन्न झाल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नवी टीम ही राज्यातील शेतकरी, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेत काम करणार असल्याचे कोते पाटील यांनी नगर येथील मेळाव्यातच जाहीर केले होते. आज नाशिक येथील बैठकीतही कोते पाटील यांनी हीच भूमिका बोलून दाखवली.

नाशिक येथील बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, प्रदेश चिटणीस नाना महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दिपक वाघ, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गौवर्धने उपस्थित होते.

संबंधित लेख